म्हणुनच की काय मला सकाळची शाळा खूप आवडायची
आमच्या भाषेत सकाळची,आज्जीच्या भाषेत बेस्तुर वार ची एकपारगी शाळा असायची,
उशिरा उठल्यामुळे माझी ग्रहापाठाची वही रिकामीच असायची,
शाळेला जाताना सकाळच्या प्रहरी थंडी जरा जास्तच असायची,
तेव्हा मास्तरांची छडी जरा जास्तच लागायची,
शाळा लवकर सुटायची,
तेव्हा आज्जी नेमाने बेस्तूर वार चा उपास करायची,
त्यामुळे दुपारी शाबुची खिचडी खायला मिळायची,
म्हणूनच की काय मला सकाळची शाळा खूपच आवडायची.
घरी आल्यावर मित्रांची लपाछपी, सुरपारंब्या खेळायची तयारी असायची,
आमच्या आजोबांची मात्र आम्हाला न्हाव्याकडे हजामतीला न्यायची घाई असायची,
तिकडे आज्जीची आजोबांकडे बाजारात विकायला अंडी द्यायची घाई असायची,
हजामती नंतर आम्हाला बाजारातील भजी खायला मिळायची,
आणि म्हणूनच की काय मला सकाळची शाळा खूपच आवडायची.
घरी आल्यावर आई घासून अंघोळ घालायची,
आठवड्याभराची दुर्गंधी क्षणात दुर व्हायची,
तोवर सांज झालेली असायची,
सगळीकडे दिवेलागणीची तयारी सुरु असायची आणि आई अभ्यास करा म्हणून पाठी लागायची,
आम्ही भावंडांनी लागलीच अभ्यासाची नाटकी करायची,
निष्कारण पेन्सिल- खोडरबर साठी भांडण करायची,
तोवर पप्पांची एन्ट्री व्हायची,
आम्ही लगेच वाह्यापुस्टके हातात घ्यायची,
पोरं अभ्यास करताना पाहून पप्पांनी चॉकलेट द्यायची
आणि म्हणूनच की काय मला सकाळची शाळा खूपच आवडायची .
@अमित जालिंदर शिंदे

Chan
ReplyDeleteखुपच छान कविता आहॆ!! माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या!!
ReplyDeleteReally missing those days
ReplyDeleteNice blog dear, keep it up
Khup mast amit vachun kharch te diwas aathvle
ReplyDeleteChan lihale ahe...
ReplyDeleteSome things are happened to me some things are not but I can feel it with your words....
Keep it up..
जुन्या आठवणी ताज्या केल्या ना राव!!!
ReplyDelete-अभिजीत शिंदे
अमित तुझ्या भावस्पर्शक शब्दांनी खरोखरच आम्हाला त्या दिवसांची सफर घडवून आणलीस.
ReplyDeleteधन्यवाद! अमित
अप्रतिम लेख आहे अमित....👌👌👌👌
ReplyDelete