क्रीडामंत्र्यांचा नवा अध्याय
आज भारताचे क्रीडा आणि महिती प्रसारण मंत्री मा.राजवर्धन सिंग राठोड यांनी आज त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय.हा व्हिडिओ आजच्या तरुणांना शारीरिक फिटनेस चे महत्व सांगणारा आहे.यामध्ये स्वतः मंत्रीमहोदय भारतीय तरुणांना भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचे समर्पक उदाहरण देऊन फिटनेस संबंधी प्रेरित तर करीत आहेतच पण स्वतःच्या केबिन मध्ये ते पुश अप्स देखील करून दाखवीत आहेत.आजकालच्या महिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक जगामध्ये एकीकडे तरुणाईच्या बळावर भारताला महासत्ता बनविण्याची स्वप्ने स्वतः पंतप्रधान पाहत असताना भारतीय तरुणाई मात्र त्याच आधुनिकीकरणाची आणि तंत्रज्ञानाची बळी पडुन शारीरिक दृष्ट्या क्षीण होत चाललेली दिसते.आणि याचाच परिणाम तरुणाईच्या कामाच्या क्षमता कमी होण्याच्या रूपामध्ये दिसून येत आहे.आज स्वतः भारताचे पंतप्रधान आणि त्यांचे काही सहकारी दिवसाचे जवळपास १७-१८ तास काम करीत असल्याची उदाहरने आम्ही रोज ऐकत असतो,पण भारतीय तरुण मात्र शारीरिक अस्वास्थ्यामुळे कामाकडे पाठ फिरविताना आणि टाळाटाळ करताना आम्ही पाहतो.त्यामुळे भारताला महासत्ता बनवायचे असेल तर आमची तरुणाई अगोदर मजबूत बनविली पाहिजे.फिटनेस चे महत्व तरुणांच्या मनावर बिंबवलं पाहिजे आणि त्यांना प्रेरित केलं पाहिजे.आणि ही प्रेरणा देण्याचे काम स्वतः क्रीडा खात्याचे मंत्री असलेल्या राजवर्धन सिंग राठोड यांनी सुरू केलेल आहे.त्या व्हिडिओ मध्ये स्वतः मंत्री महोदय किती तंदुरुस्त आहेत हेदेखील आपण पाहू शकतो. राजवर्धन सिंग राठोड स्वतः हे क्रीडा क्षेत्राशी संबंधित असलेले बहुधा पहिलेच क्रीडामंत्री असावेत आणि म्हणूनच आजवर भारताच्या कुठल्याच क्रीडामंत्र्यांना शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व वाटले नसावे पण ते राजवर्धन सिंग राठोड याना पटले आहे.त्यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन!!!
राठोड सरांच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊन मी आज संकल्प करतो आणि आपण माझ्या सर्व वाचक तरुण मित्र मैत्रिणींना विनंती करितो की आपण देखील दररोज किमान अर्धा तास व्यायाम करून स्वतःच्या फिटनेस कडे लक्ष देऊया आणि एका मजबूत तरुण महासत्ता भारताची पायाभरणी करूया.
धन्यवाद!!
अमित जालिंदर शिंदे