बापू
फोटोमध्ये डावीकडून तात्या,महेश शिंदे(बापूंंचे चिरंजीव) आणि बापू गप्पा मारत आहेत. |
यांच नाव गोविंदराव शिंदे,पण त्यांना सगळा गाव बापू म्हणुनच ओळखतो.हे आमच्याच शिंदेवस्तीचे.पण एल.आय.सी. या विमा कंपणीमध्ये असलेल्या नोकरीच्या निमित्ताने ते पंढरपुरलाच स्थायीक झालेत.गावात यांची भरपुर मोठी शेती होती,अजुनही आहे.शेतामध्ये आंबा,नारळ,चिकु,सिताफळ,डाळींब अशा फळबागा होत्या.ह्यांच्या शेतातली अजुन एक गोष्ट प्रसिध्द असायची ती म्हणजे हुरड्याची ज्वारी कारण मित्र कंपणी सोबत घेऊन सर्वाधिक हुरडा पार्ट्या करणारा गावातला हा एकमेव इसम.हे बापु आणि माझे आजोबा तात्या हे एकाच वयाचे आणि त्यामुळेच कदाचित एकमेकांचे अतिशय जवळचे मित्र.
बापू जेव्हा जेव्हा शेतात चक्कर मारायला म्हणुन पंढरपूर हुन गावी येतात त्या प्रत्येक वेळी तात्यांना भेटायच्या निमित्ताने ते घरी येतातच.यावेळीही श्री. सिद्धनाथाच्या चैत्र यात्रेच्या निमित्ताने बापू गावी आले आणि लगोलग तात्यांना भेटायला घरीही आले.
मी बापुंना तब्बल ४ वर्षानंतर पाहात होतो.त्यांचा चेहरा आणि एकुनच त्वचा सुरकुतलेली होती.देहयष्टी कमरेतून थोडीशी समोरच्या बाजुला झुकलेली.हातांमधली ताकद कमी झालेली आणि बोलताना थोडासा थकवा वाटायचा.आज वयाच्या ८५ व्या वर्षी तात्या आणि बापु दोघांची शारिरीक अवस्था एकसारखीच आहे हे मला जाणवलं.आणि मला नकळत माझ बालपण आठवायला लागल.कुठलीही नोकरी कर भले कंडाक्टर हो पण सरकारी नोकरी कर अस तात्यांच नेहमीच सांगण असतं अगदी मला कळतदेखील नव्हत तेव्हापासून. वडीलांव्यतीरीक्त आमचं भावंडांच शाळेच प्रगतीपुस्तक पाहणारी बापू ही एकमेव व्यक्ति. मी अगदी ५-६ वीला असल्यापासुन बापू मला करियर मार्गदर्शन करायचे.एवढेच नव्हे तर माझं हस्ताक्षर सुधारण्यासाठी मराठी आणि इंग्रजी अक्षरे गिरवायच्या प्लास्टिकच्या पाट्या मला बापुंनीच दिल्या होत्या.म्हणुनच आज माझ्या हस्ताक्षराला सगळीकडे प्रशंसा मिळते.आज समाजात निर्व्याजपणे गरजवंताला मार्गदर्शन करणारे बापू अतिशय नगण्य आहेत.पण तरीदेखील जोपर्यंत अशी थोडीफार माणसे समाजात आहेत,तोपर्यंत समाजातील तरुणांवर चांगले शैक्षणिक संस्कार होत राहतील यात शंकाच नाही.
@अमित जालिंदर शिंदे
@अमित जालिंदर शिंदे
True said..Amit..!
ReplyDeleteTrue said..Amit..!
ReplyDeleteThanks dada
Deleteसुंदर
ReplyDelete